महाराष्ट्राला 20 लाख घरकुल मंजूर; हे अर्जदार असणार लाभार्थी

घरकुल योजना : गरिबांसाठी आनंदाची बातमी

घरकुल योजना अंतर्गत राज्यातील गरिबांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेच्या माध्यमातून यंदा वीस लाख गरिबांना पक्की घरे देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांत सर्व गरिबांना पक्की घरे देण्याचे आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्यासाठी राजकारण हे लोकसेवेचे माध्यम आहे. नागपूरला आणि राज्यातील जनतेला अभिमान वाटेल असे काम करण्याचा माझा प्रयत्न आहे.” सरकारी योजनांमुळे होणाऱ्या खर्चाचे योग्य नियोजन सरकारने केले आहे. तीन वर्षांत विजेचे दर स्वस्त करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी गृहनिर्माण योजनेच्या अटी शिथील केल्या आहेत. आता घरकुलासाठी लाभार्थ्यांना दहा टक्के निधी जमा करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. यामुळे गरिबांना पक्की घरे मिळवणे अधिक सोपे झाले आहे.

राज्यातील वीस लाख गरिबांना हक्काची घरे मिळणार आहेत. या घरांमध्ये सौरऊर्जा उपकरणे बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे घरकुलधारकांना मोफत वीज मिळणार आहे.

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून वीस लाख घरकुलांचे गिफ्ट मिळाले आहे. या घरांचा फायदा विशेषतः शेतकरी आणि महिलांना मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “आता लाडक्या बहिणींना हक्काचे घर मिळेल.”

या योजनेमुळे गरिबांचे स्वप्न पूर्ण होण्याची मोठी शक्यता आहे.

Leave a Comment